पुणे गणपती दर्शन
रोज या ना त्या कारणाने कॅन्सल होणारा आमचा पुणे गणपती दर्शन चा कार्यक्रम आज एकदाचा ठरला होता रविवार असल्यामुळे मला तशी क्लास ला सुट्टीच होती मग काय संध्याकाळी सगळ्या रुमेट्स छान आवरून बाहेर पडलो. कुणालाही मोहवून टाकणार बाप्पांचं लोभसवाणं रूप पाहून मन खूप प्रसन्न झालं. काही मंडळांनी केलेले डेकोरेशन म्हणजे नवनवीन कल्पनांचा आविष्कारच जणू. त्यात डोळे दिपवणारी रोषणाई आणि अप्रतिम रांगोळ्या. थोड्याच वेळात माणसांनी आणि त्यांनी केलेल्या भरमसाठ कचऱ्याने सगळा रस्ताच झाकून गेला. रविवार असल्यामुळे सगळ्यांना आजच बाप्पाला भेटायचं होतं. प्रत्येक चौकात बाप्पा समोर मोठ्याने कानठळ्या बसवणारा स्पीकर वाजत होता आणि ते कमी कि काय म्हणून विनाकारण वाजणारे वाहनांचे कर्कश हॉर्न. मी एकाच दिवसात त्या आवाजाने मेटाकुटीला आली बाप्पाचे तर सुपासारखे मोठे मोठे कान तो तर पार वैतागला असेल आणि या सगळ्या गर्दी गोंगाटात समोर आलेल्या भक्ताच म्हणणं त्याला काही ऐकू गेलेलं नसेल. इथला हा सगळा कार्यक्रम आपल्या आई बाबांना फोनवरून बाप्पा कौतुकाने सांगत असेल तिकडून आपल्या बाळाच्या काळजीने व्याकुळ झालेली आई “बाळा, तू गर्दीत...