वाढदिवस...
५ एप्रील २०१७..
माझ्या पुस्तकरूपी आयुष्यातील एक सोनेरी पान..
अजूनही माझ्या लक्षात आहे तो दिवस..
तुझी आई ८ दिवसापासुनच दवाखान्यात होती. त्या दिवशी दुपारपासूनच तुझी हालचाल कमी झाली.आम्ही तुझ्या आईला धीर देत होतो पण ती रडायची थांबेना. शेवटी घाईघाईने रात्री १० वाजता तुझ्या आईला प्रसूतिगृहात नेण्यात आलं.आम्हाला काय करावं काही सुचेना.
तुझे आजी आजोबा मामा सगळे जण प्रसूतिगृहाच्या बाहेर भीती काळजी आणि आनंद या मिश्र भावना चेहऱ्यावर घेऊन बसले होते मी तर अगदी दरवाजाला टेकूनच उभी होते.सगळ्यांचं लक्ष आतून कुठली चाहूल लागते का याकडेच होते दुपारपासून सगळे भूक तहान विसरून धावपळ करत होते पण कुणाच्याच चेहऱ्यावर क्षीण मात्र दिसत नव्हता..
मी मधेच वेळ पाहिली १०.४५ झाले होते पाऊण तास झाला तरी दरवाजा काही उघडेना मी काळजीने इकडे तिकडे फिरत होती माझ्या मनात असंख्य विचारांचं काहूर माजलं होतं..तू कुणासारखा असशीलं..? लाडिवाळ बाहुली असशीलं कि नटखट कृष्ण असशीलं..?
शेवटी हळूच दरवाजा वाजला आणि आम्हाला आत बोलवण्यात आलं आमचं नंदनवन फुलवायला कृष्ण आला होता तर..
तुझी आई आणि तू दोघेपण सुखरूप होते आमचा आनंद गगनात मावत नव्हता नर्स ने हळूच तुला बाहेर आणलं आणि सर्वात प्रथम माझ्या हातात ठेवलं किती गोंडस रूप होतं तुझं..गुलाबी दुपट्यात गुंडाळलेला तू टपोऱ्या डोळ्याने माझ्याकडे पाहत होतास
"मावशी बघ मी आलो..!"
हळूच माझ्या कानात सांगत होतास.. खरं सांगते पिल्या,अवघं आकाश कवेत सामावलंय असाच भास झाला होता तेव्हा...
दिवस कसे पंख लावून उडून जातात बघ ना आज तू एक वर्षाचा झालास सुद्धा..
तुझ्या वाढदिवसाला तुला काय बरं देऊ..?
सूर्यासारखं तेजस्वी
हिमालयासारखं उतुंग
पाण्यासारखं शीतल
वृक्षासारखं संयमी
आकाशासारखं विशाल
चंद्रासारखं सुंदर
आणि
अमृतापेक्षा हि मधुर तुझं आयुष्य असेल..
खूप मोठा हो बाळा...
दीर्घायुषी भव..!!

Comments
Post a Comment