कांदेपोहे
माझा कांदेपोहे प्रोग्राम (कापो) ताई आणि जीजू कडे होता..आम्ही आदल्या दिवशी तिच्याकडे गेलो होतो..खूप दूरचा प्रवास झाल्याने सगळे दुसऱ्या दिवशी आरामात उठले..ताई सुद्धा तिच्या सासरच्या गावी असल्यामुळे आदल्या दिवशी आमच्या सोबतच तिच्या घरी आली होती..घर 10 दिवस बंद असल्यामुळे आम्ही सकाळी मग साफ सफाई चालू केली 11 पर्यंत सफाई आणि बाकीच्या arrangement होईपर्यंत मुलाच्या घरून फोन आला की आम्ही जवळपास आलोय घरचा proper पत्ता पाठवा..हे ऐकून सगळ्यांची तारांबळ उडाली मी तर माझा अर्धा scrub केलेला चेहरा वॉश करून लगेच साडी गुंडाळून बसले.. माझे केस प्रवासामुळे अतिशय खराब झाले होते काही केल्या नीट बसेना मग straightning हाच एक सुटकेचा मार्ग मला दिसला तसे मी कमरे इतके लांब फ्रीझी केस घेऊन भूत बनून बसून राहिली..अथक प्रयत्नानंतर अर्धे केस सरळ झाले तोच बाहेर गाडीचा आवाज आला आता माझ्याकडे अर्धे केस तसेच ठेवण्यावाचून काही पर्याय नव्हता..मी नेसलेली साडी ताईला अजिबात आवडत नव्हती पण पाहुणे बाहेर हॉल मधे बसले असताना साडी बदलणे मला अजिबात पटत नव्हते..शेवटी ताईला जी साडी माझ्यासाठी आवडत होती ती तिने स्वतः नेसली आणि अचानक...