Posts

कांदेपोहे

Image
माझा कांदेपोहे प्रोग्राम (कापो) ताई आणि जीजू कडे होता..आम्ही आदल्या दिवशी तिच्याकडे गेलो होतो..खूप दूरचा प्रवास झाल्याने सगळे दुसऱ्या दिवशी आरामात उठले..ताई सुद्धा तिच्या सासरच्या गावी असल्यामुळे आदल्या दिवशी आमच्या सोबतच तिच्या घरी आली होती..घर 10 दिवस बंद असल्यामुळे आम्ही सकाळी मग साफ सफाई चालू केली 11 पर्यंत सफाई आणि बाकीच्या arrangement होईपर्यंत मुलाच्या घरून फोन आला की आम्ही जवळपास आलोय घरचा proper पत्ता पाठवा..हे ऐकून सगळ्यांची तारांबळ उडाली मी तर माझा अर्धा scrub केलेला चेहरा वॉश करून लगेच साडी गुंडाळून बसले.. माझे केस प्रवासामुळे अतिशय खराब झाले होते काही केल्या नीट बसेना मग straightning हाच एक सुटकेचा मार्ग मला दिसला तसे मी कमरे इतके लांब फ्रीझी केस घेऊन भूत बनून बसून राहिली..अथक प्रयत्नानंतर अर्धे केस सरळ झाले तोच बाहेर गाडीचा आवाज आला आता माझ्याकडे अर्धे केस तसेच ठेवण्यावाचून काही पर्याय नव्हता..मी नेसलेली साडी ताईला अजिबात आवडत नव्हती पण पाहुणे बाहेर हॉल मधे बसले असताना साडी बदलणे मला अजिबात पटत नव्हते..शेवटी ताईला जी साडी माझ्यासाठी आवडत होती ती तिने स्वतः नेसली आणि अचानक...

झंझावात..

Image
एका शांत, स्तब्ध नदीसारखं माझ आयुष्य. शीतल तरीही सूर्याची किरणे तेवढ्याच अलगद सामावून घेणार... येणाऱ्या प्रत्येक दिवसाला सारख्याच ऊर्जेने सामोर जाणार.. कुणाचा हेवा नाही की कशाचा मोह नाही.. क्षण अन क्षणं फक्त स्वतः मध्ये च गुरफटलेल... आणि तू.. तू म्हणजे कायम झंझावत असणार वादळ.. तुझा मुक्काम कधी या किनाऱ्यावर तर कधी त्या.. तुझा राग त्या वादळा सारखाच प्रशुब्द आणि तेवढच वेड्यासारखं तुझ प्रेम ही.. शांत, स्तब्ध आणि एकाकी असणं तुझ्या गोत्यातच नाही.. तरीही तुझ्या येण्याची चाहूल लागली की मनात एक ऊर्मी दाटून येते.. माहिती असत मला की, आता क्षणात हे वादळ येईल आणि आपल्या सर्वांगावर उठून जाईल हजारो लाटा.. उधळून टाकील ही शांतता आणि रुतून जाईल आपल्यात खोल खोल.. इतकं खोल, इतकं एकजीव की मग कुणी  विलगच करू शकणार नाही आपल्याला.. मी ही होईल मग बेभान.. तूझ्या प्रत्येक स्पर्शाने शहारून येईल हे अंग.. उंचच उंच उसळती ल या लाटा.. मग.. मग एका क्षणी तू येशील भानावर.. तुझा तो आवेश ओसरेल..तू निवळशिल.. तुझी सगळी ऊर्जा मला देऊन तू अगदीच रीता रीता होशील.. आणि चालू ठेवशील तुझा तो निरंतर प्...

पुणे गणपती दर्शन

Image
रोज या ना त्या कारणाने कॅन्सल होणारा आमचा पुणे गणपती दर्शन चा कार्यक्रम आज एकदाचा ठरला होता रविवार असल्यामुळे मला तशी क्लास ला सुट्टीच होती मग काय संध्याकाळी सगळ्या रुमेट्स छान आवरून बाहेर पडलो. कुणालाही मोहवून टाकणार बाप्पांचं लोभसवाणं रूप पाहून मन खूप प्रसन्न झालं. काही मंडळांनी केलेले डेकोरेशन म्हणजे नवनवीन कल्पनांचा आविष्कारच जणू. त्यात डोळे दिपवणारी रोषणाई आणि अप्रतिम रांगोळ्या. थोड्याच वेळात माणसांनी आणि त्यांनी केलेल्या भरमसाठ  कचऱ्याने सगळा रस्ताच झाकून गेला. रविवार असल्यामुळे सगळ्यांना आजच बाप्पाला भेटायचं होतं. प्रत्येक चौकात बाप्पा समोर मोठ्याने कानठळ्या बसवणारा स्पीकर वाजत होता आणि ते कमी कि काय म्हणून विनाकारण वाजणारे वाहनांचे कर्कश हॉर्न. मी एकाच दिवसात त्या आवाजाने मेटाकुटीला आली बाप्पाचे तर सुपासारखे मोठे मोठे कान तो तर पार वैतागला असेल आणि या सगळ्या गर्दी गोंगाटात समोर आलेल्या भक्ताच म्हणणं त्याला काही ऐकू गेलेलं नसेल. इथला हा सगळा कार्यक्रम आपल्या आई बाबांना फोनवरून बाप्पा कौतुकाने सांगत असेल तिकडून आपल्या बाळाच्या काळजीने व्याकुळ झालेली आई “बाळा, तू गर्दीत...

माझी शाळा। माझं बालपण।

Image
लहान असताना उन्हाळयाच्या सुट्टीत आजीकडे जायची मजा काही औरच असते आज घरात बसून विडिओ गेम्स खेळणाऱ्या पोरांना पाहिलं की मनोमन वाटत आपण 95 च्या आधीची पिढी खरच खूप भाग्यवान आहोत बालपण काय असत हे आपणच शेवटचं खरंखुरं जगलय.. शाळेत जाताना सकाळी आई केसांना तेल लावून करकचून 2 वेण्या घालून द्यायची एक सॉक्स सापडत नाही म्हणून मला रोजच शाळेला उशीर व्हायचा मग आई जुना थोडा पांढरा पडलेला सॉक्स कुठून तरी शोधून आणायची आणि शाळेत पूर्ण दिवस तो एक सॉक्स वर ओढण्यात जायचा.. माझी शाळा घरापासून जवळच होती त्यामुळे 5 वी नंतर मी सायकल ने शाळेत जायची उशीर झाला की शाळेचं गेट बंद व्हायचं मग मी त्या गेटवरून चढून आत जायची पण कधीतरी सरांच्या नजरेस पडली की मग ग्राउंड च्या 5 फेऱ्या मारायला लागत आणि तो घाम गाळलेला कमी की काय म्हणून सर अजून आमच्याकडून ग्राउंडवरचा कचरा उचलून घेत पण त्यात एक चांगली गोष्ट ही व्हायची की वर्गात जाईपर्यंत अर्ध अधिक अथर्वशीष संपलेलं असायचं मला भलताच आनंद व्हायचा.. वर्गात बसलो असताना नवीन नवीन गोष्टी आम्हाला सुचायच्या कधी टेबल वाजव कधी विमान बनव तर कधी वही वर लिहून लिहून गप्पा कर.. एकदा तर माझ...

नवीन प्रवास

Image
बऱ्याच दिवसाने घरी जायचं म्हंटल कि पॅकिंगला आपोआपच वेग येतो आणि त्यात जर फॅमिली टूर ला जायचं असेल तर दुधात साखर.. तसंच आज माझं झालेलं १८ च पुणे यवतमाळ बुकिंग कॅन्सल करून १७ ला केलं होत कारण आता एक दिवस पण इथे थांबायचं म्हणजे १वर्षासारखं वाटलं असत मला..६ ची गाडी होती  मी दुपारी ३ पासूनच सगळं आवरून बसली होती ५.३० ला संगमवाडीला पोचली..आभाळ आलेलं होत माझी गाडी लागलेली होती मी माझी सीट शोधून सामान ठेवलं आणि निवांत बसून घेतलं..थोड्यावेळात बस निघाली ती सोबत पावसाच्या सरी घेऊनच.. मी घरच्या वाटेने जातेय त्यात पाऊस आणि सोबतीला माझ्या आवडीची निवडक गाणी..हाच काय तो मी वाट पाहत असलेला सगळ्यात आनंदाचा क्षण.. रात्री  ९ ला गाडी थांबली मी सोबत आणलेला टिफिन खाल्ला आणि छान झोपी गेली सकाळी उठल्यावर मी माझ्या विदर्भात असणार याचा किती आनंद होत होता हे तर आता इथे शब्दात पण मांडता यायचं नाही मला.. सकाळी उठली तेव्हा ७ वाजले होते मी विंडो मागे सारून बाहेर पाहिलं पण इकडे मात्र सगळं कोरडठणं होत ,पावसाच्या काही खुणा नव्हत्या सगळी जंगलं निष्पर्ण ,ओसाड; नदीपात्र सुकलेली..मन खट्टू झालं. ९ ला गाडी यवतम...

वाढदिवस...

Image
५ एप्रील २०१७.. माझ्या पुस्तकरूपी आयुष्यातील एक सोनेरी पान.. अजूनही माझ्या लक्षात आहे तो दिवस.. तुझी आई ८ दिवसापासुनच दवाखान्यात होती. त्या दिवशी दुपारपासूनच तुझी हालचाल कमी झाली.आम्ही तुझ्या आईला धीर देत होतो पण ती रडायची थांबेना. शेवटी घाईघाईने रात्री १० वाजता तुझ्या आईला प्रसूतिगृहात नेण्यात आलं.आम्हाला काय करावं काही सुचेना. तुझे आजी आजोबा मामा सगळे जण प्रसूतिगृहाच्या बाहेर भीती काळजी आणि आनंद या मिश्र भावना चेहऱ्यावर घेऊन बसले होते मी तर अगदी दरवाजाला टेकूनच उभी होते.सगळ्यांचं लक्ष आतून कुठली चाहूल लागते का याकडेच होते दुपारपासून सगळे भूक तहान विसरून धावपळ करत होते पण कुणाच्याच चेहऱ्यावर क्षीण मात्र दिसत नव्हता.. मी मधेच वेळ पाहिली १०.४५ झाले होते पाऊण तास झाला तरी दरवाजा काही उघडेना मी काळजीने इकडे तिकडे फिरत होती माझ्या मनात असंख्य विचारांचं काहूर माजलं होतं..तू कुणासारखा असशीलं..? लाडिवाळ बाहुली असशीलं कि नटखट कृष्ण असशीलं..? शेवटी हळूच दरवाजा वाजला आणि आम्हाला आत बोलवण्यात आलं आमचं नंदनवन फुलवायला कृष्ण आला होता तर.. तुझी आई आणि तू दोघेपण सुखरूप होते आमचा आनंद गगनात म...